Best and 1st ever Lewa patil Matrimoney
I am a
seeking a
who is from to
who has a photo  
Advance Search  
 
|
|
|
       
Member Login  Username:   Password:   Register Now
Quick Links
  Register Now - FREE
  Upload Photos
  Add profile data
 Send by Post

News
Back  
Success Story
Jan 06, 2013

 
आकाशविहारात शीतलची गगनभरारी..!
मंगेश फल्ले | Jan 05, 2013, 03:23AM IST
 
पुणे- शेकडो फूट अवकाशातून जमिनीवर झेप घेण्याच्या ‘स्कायडायव्हिंग’ क्रीडाप्रकारातील देशातील पहिली महिला प्रशिक्षक होण्याचा मान पुण्याच्या शीतल महाजन-राणे हिने मिळवला आहे.  

मागील 2004 मध्ये शीतलने उत्तर ध्रुवावर -37 अंश सेल्सियस इतक्या कडाक्याच्या थंडीत चोवीसशे फुटांवरून उडी मारली होती. सन 2006 मध्येही दक्षिण ध्रुवावर -38 अंश सेल्सियस तापमानात तब्बल साडेअकरा हजार फूट उंचीवरून तिने उडी मारली होती. दोन्ही ध्रुवांवर अशी कामगिरी करणारी शीतल महाजन ही जगातील पहिलीच तरुणी ठरली होती. या कामगिरीबद्दल शीतलला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ देऊन गौरवण्यात आले आहे. तिच्या शिरपेचात आता आणखी एक तुरा खोवला गेला आहे. 


अमेरिकेत तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शीतल स्कायडायव्हिंगच्या अवघड परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. ‘दिव्य मराठी’शी बोलताना ती म्हणाली, ‘स्कायडायव्हिंग प्रशिक्षक पदाच्या परीक्षेची अनुमती मिळवण्यासाठी किमान 500 पॅराजंप, पाच तासांचा हवेत उडण्याचा (फ्लांइग टाइम) अनुभव व प्रशिक्षक पदाचे सामान्य ज्ञान असावे लागते. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी निवड होते. यानंतर तीन दिवसांची लेखी परीक्षा होते. यंदा कॅलिफोर्नियात झालेल्या प्रशिक्षक परीक्षेसाठी आशियातून मी एकमेव सहभागी होते. प्रशिक्षक पदानंतर आता परीक्षक (एक्झामिनर) होण्यासाठी माझी तयारी सुरू आहे.’’


पद्मश्री शीतलची अतुल्य कामगिरी

० उत्तर व दक्षिण दोन्ही ध्रुवांवर कोणत्याही सरावाशिवाय उडी घेणारी जगातील पहिली महिला. 
० गत 2008 मध्ये शीतलने वैभव राणे यांच्याशी 600 ते 800 फूट उंचीवर हवेत एअर बलूनमध्ये भारतीय पद्धतीने विवाह केला.  
० 2010  मध्ये ‘बर्ड मॅन सूट/ विंग’ हा पक्षासारखा वेष परिधान करून स्पेन येथे 13 हजार फुटांवरून उडी
० 2011  मध्ये साडेपाच हजार फुटांवरून हॉट एअर बलूनमधून पॅराशूटच्या साहाय्याने उडी घेणारी पहिली भारतीय महिला ठरली.  
० 2012 मध्ये अमेरिकेतील 70 व्या स्कायडायव्हिंग फॉरमेशनमध्ये सहभाग घेतला.

 Site usage Disclaimer: Wajantri.com offering a best way to find partners from Lewa patil community online. This site is only made for Lewa Patil and Patidar community and we do not offer this other community members as of now. While registering and searching for any profile ensure to use professionalism and follow internet etiquettes to sustain the free initiatives for the community. We also appeal to seek your participations, contributions for maintaining the site as well as any financial help you can offer. We run some sponsorship and advertising programs too, if you are interested do contact us for the same and we will be happy to help you. Please refer to terms and conditions for more


Quick Access Links